संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणादायी मार्गदर्शन उत्साहाच्या वातावरणात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात उच्चपदस्थ विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गुणवंत विद्यार्थी उपजिल्हाधिकारी महेश येलगटे व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सी. ए.पदवी प्राप्त करणारे प्रसाद गादेवार या विद्यार्थ्यांचा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील यांच्या हस्ते शाल,फेटा, पुष्पहार व ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
सोबत उपस्थित माता पालक आरती गादेवार व पिता पालक श्रीनिवास येलगटे यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश यलगटे व सी.ए.पदवी प्राप्त प्रसाद गादेवार या दोघांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय समारोप गणेश दादा हाके पाटील यांच्या भाषणाने झाला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी केले तर आभार शारदा तिरुके यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.