छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप कडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारी का भारताच्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यांची 194 वी जयंती छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपने योगा मैदानावर आज सकाळी दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:00 वाजता मान्यवराच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती शाहूराज योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री अविनाश मंदाडे आणि जगदीश जाधव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गणेश दादा वाघमारे श्रावण दादा वाघमारे डीएस वाघमारे राजकुमार वाघमारे एन डी राठोड बालाजी दुगाणे रावसाहेब वाघमारे हरीश नागमोडे पंढरी वाघमारे ज्ञानोबा गायकवाड हिरामणजी धसवाडी कर यांच्याकडूनही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यानंतर सन्माननीय सदस्य श्री डी एस वाघमारे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की समाजाकडून अनेक हाल अपेक्षा सहन करूनही त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी 1948 मध्ये पुण्यामध्ये आणि पुण्याच्या परिसरामध्ये एकाच वर्षात 20 शाळा चालू करून शिक्षण क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली. त्यांना या कामी ज्योतिराव फुले यांची खूप मोलाची साथ मिळाली.