किलीबल नॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका, अंजली भंडारे, स्वाती कुमठेकर, संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
ज्ञानोबा भोसले पुढे बोलताना म्हणाले, की 18 व्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी मोठे कार्य केले. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्या केवळ फुले दाम्पत्याच्या दूरदृष्टीमुळे. चूल आणि मूल या पारंपरिक चौकटीतून महिलांना बाहेर काढून शिक्षण दिल्याने महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत, ही अमूल्य गोष्ट आहे.