ठाकरे शिवसेनेच्या वतीने मिनाताई ठाकरे यांना अभिवादन
लातूर : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची सावली, तमाम शिवसैनिकांची माऊली मॉ साहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक यांच्या हस्ते माॅंसाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दिनेश जावळे, राहुल मातोळकर, त्र्यंबक गुरुनाथ स्वामी,शंकर रांजणकर,सोमनाथ स्वामी डिगोळकर,खंडू जगताप,दिलीप भांडेकर, एस आर चव्हाण, शिवदास पवार, राधाकिसन गंगणे , परमेश्वर सुर्यवंशी रेणापूर, नारायण माने, नागुअन्ना सुतार, राकेश रणखांब, खंडु जगताप, रुषिकेश पाटील, राहुल रोडे, चंद्रशेखर कालीदास मेटे, दिपक चिंचकर, शेख चांदमिंया सर, सुरेश शिंदे, सगर खाडगावकर, बाळु लड्डा, विखार देशमुख, संतोष माने, हणुमंत पडवळ अदी सह शिवसैनिक उपस्थित होते.