महात्मा फुले महाविद्यालयाने वतीने गुरु गोविंद सिंग, जांभेकर व तेंडुलकरांना बेळगावात केले अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : शीख धर्माचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंग,भारतीय पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार विजय तेंडुलकर यांना महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने दक्षिण भारत अभ्यास अभियानाअंतर्गत बेळगाव येथे अभिवादन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील प्राध्यापकांची दक्षिण भारत अभ्यास अभियान सुरू असून, या अभियाना अंतर्गत आज कर्नाटक राज्यातील बेळगाव या मराठी भाषिकांच्या भूमीत जागतिक अनाथ दिन तथा युद्ध टाळ दिन व पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पण दिन’ आदी कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी गुरु गोविंदसिंग, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार विजय तेंडूलकर यांच्या नाट्य अंतरंगाचे तसेच युद्धातून होणारे जागतिक अनाथ दिनाचे तसेच ‘दर्पण’ दिनाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले व आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे, प्रोफेसर ह.भ.प. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रोफेसर डॉ. नागराज मुळे, डॉ. पांडुरंग चिलगर, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. बी.के. मोरे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापुरे आदींचा समावेश आहे.