एलसीबीची पुन्हा मोठी कारवाई !!वाहनासह 10 लाख 84 हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त !!
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सतत धडाकेबाज मोहीम राबवत आपले वेगळेपण जपले आहे. एकानंतर एका अवैध धंद्यावर कारवाई करत असतानाच, दहा लाख 84 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 10/01/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी ते नीटूर ते लातूर वाहतूक होणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 10/01/2025 सकाळी लोदगा गावाजवळ सापळा लावून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनाची झडती घेतली असता सदरची ईरटीका क्रमांक एम.एच. 24 बी.आर. 8549 असा असल्याचे दिसले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीसह विमल नावाचा गुटखा आढळून आला. 84 हजार 325 रूपयाचा विमल गुटखा व कार किंमत 10 लाख, एकूण 10 लाख 84 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला आलेले इसम नामे श्रीकांत व्यंकटराव नरके, (वय 37 वर्ष, राहणार सारोळा रोड, विवेकानंद चौकाजवळ, श्रीनगर, लातूर).याचे विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे औसा चे पोलीस अधिकारी, अंमलदार करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, राहुल कांबळे,नितीन कठारे यांनी पार पाडली.