नाशिक येथे झालेल्या विश्वविक्रमी काव्य वाचनात संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 17 बालकवींचा सहभाग
अहमदपूर (गोविंद काळे) : बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नाशिकच्या ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दि. 18 व 19 जानेवारी 2025 या दोन दिवसीय काव्यहोत्र अर्थात विश्वविक्रमी काव्य संमेलनाचे आयोजन नाशिकच्या डे केअर शाळेच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते.
या उपक्रमात राज्यभरातील 671 बालकवींनी सहभाग नोंदवून आपल्या कविता सलग 29 तास सादर केल्याने त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये करण्यात आलेली आहे.
24 तास सलग कविता सादर करण्याचा विक्रम मोडीत काढून सलग 29 तास काव्यवाचन बालकवींनी केलेले आहे.
यात लातूर जिल्ह्यांमधून एकमेव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या 17 बालकवींनी सहभाग नोंदवून आपल्या कविता सादर केल्या त्यांच्या समवेत महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आशा रोडगे-तत्तापुरे, सहशिक्षक सतीश साबणे,
सहशिक्षक युवराज मोरे सहभागी होते.
सहभागी बालकवींचा नाशिकच्या ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव गोपाळ पाटील, वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैन,मुकेश छेडा, अथर्व शुक्ल, डायट मुरुडच्या प्राचार्या डॉ.भागीरथी गिरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, गणेश प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, सचिव तथा प्राचार्या रेखाताई हाके-तरडे, उपाध्यक्ष एडवोकेट मानसी हाके पाटील, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्यासह पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.