ठाणे अंमलदार रामकिशन राजगिरवाड यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेले आर. एस. राजगिरवाड यांनी अतिरिक्त सत्र न्यायालय अहमदपूर व हायकोर्ट छत्रपती संभाजी नगर येथील सर्व नोटीस, समंस, वॉरंट शंभर टक्के तामिल केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अहमदपूर पोलिस स्टेशन येथे सन्मानित केले. यावेळी पोलिस स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनुर उपस्थित होते. या यशाबद्दल रमेश चव्हाण, बाबासाहेब वाघमारे,हरीराम गुट्टे, व्यंकट सांगुळे,भरत रोकडे, दराडे सर,मामडेवार सर, लक्ष्मण अलगुले,या सर्व मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या उत्कर्ष सेवेबद्दल अभिनंदन केले. पुढील देशसेवा कार्यास शुभेच्छा दिली.