सरपंच सौ शिवनंदा हिप्परगे प्रजासत्ताकदिनी जाणार दिल्लीला
परचंडा गावाला मिळला प्रथमच मान
अहमदपूर (गोविंद काळे) : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील सरपंच सौ शिवनंदा राजेंद्र हिप्परगे व त्यांचे पती श्री राजेंद्र गुराप्पा हिप्परगे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या संदर्भात नुकतेच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र प्राप्त झाले आहे. यावर्षीच्या दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड करिता लातूर जिल्ह्यातून एकमेव परचंडा गावची निवड झाली आहे तर अहमदपूर तालुक्याला बहुमान दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे नवी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित राहण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका ग्रामपंचायत सरपंचाची नावे त्यांच्या कुटुंबासह केंद्र शासनाच्या सूचनानुसार निवड करण्यात आली आहे यासंदर्भात महाराष्ट्र शासन याची पत्र संबंधित विभागाला प्राप्त झाली आहे तालुक्यातील महिला सरपंचाला दुसऱ्यांदा बहुमान मिळाल्याने त्यांचे सरपंच संघटना तसेच गावकरी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.