पतंजली योग समितीच्या वतीने पुरस्कार प्राप्त योगाचार्यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : सोमवार. येथील पतंजली योग समितीच्या वतीने योग विभूषण सौ. कलावती शिवमूर्ती भाताम्ब्रे, सुवर्णपदक विजेते प्रमोद कुलकर्णी वालेवाडीकर, क्रीडा रत्न केशव राजाराम मुण्डकर व पर्यावरणमित्र श्री. अनिल त्र्यंबकराव चवळे या योगाचार्यांचा त्यांनी नुकत्याच मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सत्कार करण्यात आला. हरिद्वार येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय योग संमेलनात सौ. कलावती भातांब्रे यांना स्वामी रामदेव महाराज यांचे हस्ते योगविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंबड येथील राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत वयाच्या ६९व्या वर्षी १८० सूर्यनमस्कार घालून प्रमोद कुलकर्णी यांनी सुवर्णपदक मिळवले. श्री. केशव राजाराम मुंडकर यांना क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच उदगीर येथे जिल्हास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच अभियंता अनिल चवळे यांचा नुकताच मुंबई येथे रोटरी प्रांत परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. हे सर्वचज्ञजण पतंजली योग समिती, अहमदपूरचे सदस्य असल्याने समितीतर्फे आज सर्वांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी डॉक्टर पांडुरंग टोपे, डॉक्टर नरहरी सुरनर, डॉक्टर सौ. स्वाती व सुहास जोशी, प्रा.गुरुनाथ चवळे, श्री. सोमनाथ रोडगे, श्री. बापूराव शिरुरकर, सौ. मनीषा मुंडकर, सौ. कुसुम दिवाण, सौ. सुरेखा उगीले, सौ. अंजली व श्री. सागर कुलकर्णी, सौ. छाया व श्री. विश्वनाथ विळेगांवे, सौ. दयावती हिंगरुपे, श्री. कृष्णा कुलकर्णी, श्री. लक्ष्मण गलाले, सौ. पुष्पा ठाकूर, सौ. वृषाली चवळे, बाळासाहेब जाधव, श्री. शरद जोशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सौ.राधिका व मधुसूदन चेरेकर, सौ. प्रतिभा व उमेश चेरेकर, अशोक गायकवाड व कृष्णा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.