क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर.टी.ओ. कार्यालय लातूरच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान संपन्न

0
क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर.टी.ओ. कार्यालय लातूरच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान संपन्न

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर.टी.ओ. कार्यालय लातूरच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान संपन्न

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी हेल्मेट व सीट बेल्टची सक्ती करावी.

अहमदपूर (गोविंद काळे) : आर.टी.ओ. कार्यालय लातूरच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य जेबाबेरला नादार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर. टी. ओ. लातूरचे पोलीस इन्स्पेक्टर संदीप मोरे व मंगेश गवारे यांची उपस्थिती होती. तसेच शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, बस वाहतूक सुपरवायझर गोविंद वलसे, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बस चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

पो. इन्स्पेक्टर मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये रस्त्याच्या बाबतीत असलेले नियम, त्या नियमांचे पालन करून वर्षाला होणारे लाखो अपघात त्याचं प्रमाण शून्य करण्यासाठी आमची राज्यभरात धडपड चालू आहे. यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना, शाळेतील बस चालकांना, समाजातील लोकांपर्यंत पोहोचून याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनी घरी आपल्या पालकांना हेल्मेट, सीट बेल्ट, वाहतूक नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची विनंती करावी. रस्त्यावरील अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करावी. पो. इन्स्पेक्टर गवारे यांनीही विद्यार्थ्यांना, बस चालकांना, सुरक्षा वाहतुकीची शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन संगमेश्वर ढगे यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलीसया गोमॅंगो, गोविंद वलसे यांनी अथक मेहनत घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *