आहे तसे घेणे आणि पाहिजे तसे घडवणे हाच उदयगिरी पॅटर्न – रामचंद्र तिरुके
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘उदगीर टॅलेंट सर्च परीक्षा’ आयोजित केली होती. त्यातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे यांच्या हस्ते व पर्यवेक्षक प्रा. एस. वी. मुडपे, पर्यवेक्षक प्रा. टी. एन. सगर, प्रा. ध्रुव यादव, प्रा. सचिन सोंत, प्रा. पंकज निराला, प्रा. पल्लवी गुजर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. जेईइसाठी ऋषभ सुगंधी, अथर्व पेठे, श्रेयास माना, यश पेठे, सुशेन हुडगे, अथर्व बागबंदे, प्रथमेश गुडापे, गौरव भुसागरे, श्रावणी मामडगे, ऋषिकेश साळुंखे तर नीट साठी चैतन्य जाधव, प्रतीक देवनाळे, शिवरत्न सोनकांबळे, स्नेहा भुरे, आकाश वाघमारे, स्नेहा केंद्रे, मंगेश मुळे, साई चांदेगावकर, ओंकार भाडे, स्नेहा पाटील या विद्यार्थ्यांना व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल विश्वजीत लोहार याचा स्मृतीचिन्ह पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भूमी सुडे, वैष्णवी काकनाळे या विद्यार्थिनींनी नीट, जेईई वर्गासाठी महाविद्यालयातील ग्रंथालय, अभ्यासिका, शांत वातावरण वैयक्तिक लक्ष याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात या वर्गांसाठी आहे तसे विद्यार्थी घेतले जातात व पाहिजे तसे घडविले जातात. यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के म्हणाले नीट,जेईई साठी महाविद्यालयाने हा अभिनव उपक्रम राबवला आहे. त्याला विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक समन्वयक प्रा. व्हि. डी. काकनाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. वाय. जालनापुरकर यांनी केले तर आभार प्रा. एन. के. खांडेकर यांनी मानले.