शास्त्री प्राथमिक विद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात हिंदू धर्मातील पवित्र सण मकर संक्रांतीनिमित्त माता-पालक संघातर्फे सौ.आशालता तुकाराम कल्लूरकरबाईंनी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ.सुनिता बालाजी पंदरगे,प्रमुख अतिथी म्हणून सौ.सुनिता लक्ष्मीकांत नेलवाडकर, विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी,बालवाडी प्रमुख सौ.छायाबाई कुलकर्णी तसेच, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.सुनिता नेलवाडकरताईंनी माता पालकांना उद्याचा भारत घडवायचा आहे.साधनांचा अतिरेक झाला की सुखाचा लोभ होतो.मुलांना जास्तीत जास्त स्वतः अनुभव घेऊ द्या.आजी-आजोबासोबत राहू द्या.मुलांना शिष्टाचार शिकवावेत.त्यांना जे आवडते ते करू द्यावे.त्यांना ताजा व सकस आहार द्या.असे विचारांचे वाण दिले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात सौ.सुनिता पंदरगेताईंनी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी जाणून घेण्यासाठी शिक्षकांशी नेहमी संपर्कात रहावे.आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.आपण एक सुज्ञ पालक म्हणून समाधानी आहात का?एक सुज्ञ व जबाबदार पालक म्हणून आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
सर्व माता -पालकांसाठी संगीत खुर्ची व तळ्यात मळ्यात या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.संगीत खुर्चीमध्ये सौ.सोनाली विजयकुमार दोरवे-प्रथम,सौ.सोनाली अंबादास चिखले-द्वितीय,सौ.अश्विनी दत्ता पाटील तर, तळ्यात मळ्यात स्पर्धेत सौ.पस्तापुरे शेजल अमोल -प्रथम,सौ.अश्विनी दत्ता पाटील -द्वितीय,सौ.लक्ष्मी वीरभूषण केंद्रे -तृतीय सर्व विजयी स्पर्धकांना शाळेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले.सर्व माता पालकांना हळदी कुंकू व तिळगुळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सविता बोंडगेबाईंनी केले.स्वागत व परिचय तसेच, वैयक्तिक पद्य श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी सादर केले.सुत्रसंचलन सौ.सोनिया देशपांडे यांनी तर आभार आशालता कल्लूरकरबाईंनी मानले.