शिवाजी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
उदगीर(एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व जयंती समितीच्या वतीने सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे होते. महामानवांच्या प्रतिमेस सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी आपल्या मनोगतामध्ये डॉ.मांजरे म्हणाले, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी केली.तुम मुझे खुन दो मैं तुम्हें आझादी दूँगा हा नारा दिला.बाळसाहेब ठाकरे यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी विचार मांडले. शिवसेना पक्षाची स्थापना करून हिंदू धर्म व त्याच्या रक्षणाची भूमिका घेतली म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटले जाते. असे विचार त्यांनी या प्रसंगी मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रो. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.डी.बी. मुळे यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ.एल. एच. पाटील, डॉ.एस.डी.निटूरे, डॉ.ए. एस. टेकाळे,प्रबंधक बालाजी पाटील, व्ही. डी.गुरनाळे, आर.एम.लाडके, डॉ. व्ही.डी.गायकवाड, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.