शास्त्री शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात भारतीय क्रांतिकारी,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख अतिथी म्हणून बळवंत देशमुख व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक बळवंत देशमुख यांनी प्रखर देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी सविस्तरपणे माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी सुभाषचंद्र बोस हे उच्च शिक्षीत होते.जहालमतवादी होते.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला.आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असावे,असे आवाहन केले.
सुत्रसंचलन सचिन आगलावे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली.