शास्त्री प्राथमिक शाळेत सामुहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी समिती व कै.बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान, उदगीर द्वारा शहर पातळीवर सामुहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून प्रमोदराव कुलकर्णी कार्यकारिणी सदस्य कै.बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान, उदगीर ,प्रमुख पाहुणे म्हणून वैजनाथराव मारमवार सदस्य भा.शि.प्र.संस्था व उमाकांतराव बुधे कार्यकारिणी सदस्य,कै.बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान,उदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर संस्था केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,शाळेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,सदस्य बालाजी चटलावार,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपूरे, ज्येष्ठ स्वयंसेवक लक्ष्मण रेड्डी, दत्तात्रय पवार,नागनाथ उटेकर,अंधोरीकर,गुट्टे सर,लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे , विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी, संयोजक सुधाकर पोलावार,सहसंयोजक माधव केंद्रे उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे शाल,ट्रॉफी, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रमुख अतिथी वैजनाथ मारमवार यांनी आज सर्वत्र स्पर्धा पहायला मिळते.आपण स्पर्धेत टिकण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेचे महत्त्व सांगितले.दुसरे प्रमुख पाहुणे उमाकांत बुधे यांनी कै.बाळासाहेब दीक्षित यांच्या कार्याची ओळख करून दिली.अध्यक्षीय समारोपपर भाषणात प्रमोद कुलकर्णी यांनी कै.बाळासाहेब दीक्षित यांनी अनेक उपक्रम राबवून तरुणांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले होते.कै.बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान तर्फे शहर पातळीवर सामुहिक देशभक्तीपर गीत गायण स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच केलेले आहे.या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच गायनाची आवड निर्माण होईल व देशभक्तीचे बीज रुजवले जाईल.विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अश्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सदरील स्पर्धा १ ली ते ४ थी व ५ वी ते ८ वी अश्या दोन गटांमध्ये घेण्यात आली.१ ली ते ४ थी गटात एकूण ७ व ५ वी ते ८ वी गटातून एकूण ७ संघांनी भाग घेतला होता. पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून अप्पाराव कुलकर्णी, अध्यक्ष कै.बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान, उदगीर व प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे सदस्य लक्ष्मीकांत नेलवाडकर उपस्थित होते.अप्पाराव कुलकर्णी यांनी सात स्वरांचा उगम कसा झाला.संगीत क्षेत्रातही आपण करीयर करु शकतो.सर्व सहभागी शाळांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत १ ली ते ४ थी गटातून लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय -प्रथम,पोस्ते पोद्दार -द्वितीय व टाईम्स पब्लिक स्कूल -तृतीय तर,५ वी ते ८ वी गटातून लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय -प्रथम,पोस्ते पोद्दार -द्वितीय व संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय -ततीय यांनी क्रमांक मिळविला. विजेत्या संघाला प्रथमसाठी रोख ११०१रु.व स्मृतीचिन्ह, द्वितीयसाठी-७०१ रु.व स्मृतीचिन्ह तर,तृतीयसाठी-५०१ रू.व स्मृतीचिन्ह व फिरती ढाल देण्यात आली. या स्पर्धेसाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर गुरुजींची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले तसेच, सेवानिवृत्त संगीत शिक्षक गोपाळ जोशी यांचे सहकार्य मिळाले.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बस्वराज शिवपूजे, डॉ.अर्चना पाटील व तरंगिनी स्वामी यांनी कामकाज पाहिले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे ,श्याम गौंडगावे यांनी केले.स्वागत व परिचय श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी तर, सुत्रसंचलन सौ अर्चनाताई सुवर्णकार व श्याम गौंडगावे यांनी केले.आभार सौ.सविता बोंडगे व सहसंयोजक माधव केंद्रे यांनी मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.