लोकमत ने सहकार्याची नाते जपले – माजी मंत्री बाळासाहेब जाधव

लोकमत ने सहकार्याची नाते जपले - माजी मंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : लोकमत बातमी नसून सामाजिक बांधिलकी आहे त्याच धर्तीवर आदरणीय बाबूजी ने लोकमत ची सुरुवात केली होती माझा आणि बाबुजींचा आठ वर्षाचा सहवासात मी त्यांना जवळून पाहिले सामाजिक बांधिलकी हे भान ठेवून त्यांनी अनेक उपक्रम सुरुवात केली लोक संपर्कही ठेवला लोकांच्या मनामनात आणि घराघरात आपल्या बोलण्याने लोकमत पोचवले त्यांचे घरगुती संबंध होते मी त्यांचे कार्य अगदी जवळून पाहिले आहे सचोटी कार्यकुशलता दृढता आहे त्यांचे महत्त्वाचे गुण होते त्यामुळेच लोकमतचा वटवृक्ष झाला आजही तीच ब्रीदवाक्य घेऊन विजयबाबू राजेंद्रबाबू काम करत आहेत. माजी मंत्री बाळासाहेब जाधव रक्तदान उदघाटनाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ , लोकमतचे वृतसंंपादक धर्मराज हल्लाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद हिंगणे, आगारप्रमुख शंकर सोनवणे, प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार, सतीश बिलापट्टे, रोटरी क्लब अध्यक्ष अॅड. सचिन करकनाळे, उमाकांत कासनाळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी मंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले लोकमतच्या महारक्तदान शिबिराचे महाराष्ट्रात हजारो जणांनी रक्तदान केले त्याचा फायदा गोरगरीब दीनदलित गरजू यांना निश्चितच होणार आहे असेच उपक्रम लोकमत निर्णय घ्यावेत व सामाजिक बांधिलकीचे नाते जपावे असेही त्यांनी सांगितले.

पोलीस स्टेशन अहमदपूर नगर परिषद अहमदपुर भक्ती स्थळ रोटरी क्लब महात्मा फुले महाविद्यालय परिवार, लहुजी साळवे कर्मचारी महासंघ कापड असोसिएशन महेश बँक अहम्मदपूर आगार स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्यसेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त अहमदपूर येथे बुधवारी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ५९ जणांनी रक्तदान केले. लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चवळे यांनी केले तर आभार प्रा.विश्वभंर स्वामी यांनी मानले.

About The Author