नागाने विषारी परड जातीच्या सापाला गिळंकृत केले
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील शेल्हाळ येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जवळपास सहा फूट लांबीच्या नागाने दुसऱ्या एका विषारी चार फूट लांबीच्या परडाला अलंकृत केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान तेथील नागरिकांनी तात्काळ सर्पमित्र श्याम पिंपरे यांना बोलावून घेऊन या दोन्ही सापांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू सर्पमित्र येईपर्यंत नागाच्या दंषामुळे परड जातीचा साप मरण पावला होता. शेल्हाळ येथील विद्वान कल्याणी व हनुमंत कल्याणी हे दोघे कुलर कंपनीत काम करत असताना बुधवारी दुपारी कंपनीमध्ये त्यांना दोन साप दिसले. त्यांनी लगेच सर्पमित्र शाम पिंपरे यांना यासंदर्भात माहिती कळवली. पिंपरे यांनी नागाची शेपटी धरून ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बाहेर निघत नव्हते. नागाला धोक्याची कल्पना आल्याने त्याने गीळंकृत केलेल्या परडाला पुन्हा बाहेर टाकले. हे असेच चित्र ग्रामीण भागात पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान परड मरण पावल्यामुळे त्याला तिथेच टाकून नागाला पकडून सर्पमित्रांनी त्याला जीवदान देण्यासाठी घेऊण गेले.