महिलांना अधूनिक शेतीसाठी पोकराची सक्षम साथ – डॉ. मेघना केळकर
कुमदाळ (हेर) येथे महीलांची शेतीशाळा संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील गावात पारंपरिक पद्धतीने शेती न करता कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी शेती करा म्हणजेच महिलांना अधूनिक शेतीसाठी पोक्राची सक्षम साथ मिळणार आसल्याचे आवाहन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या मुख्य कृषी व्यवसाय तज्ञ डॉ. मेघना केळकर बुधवारी (ता.१४) महिला शेतीशाळेत मार्गदर्शन करताना केले.
या वेळी राज्य प्रकल्प सहाय्यक पुनम काने, प्रकल्प तंत्राधिकारी निलेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तिर्थकर, तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे, सरपंच सौ.उमा साखरे, प्रकल्प वि.कृषी लातूरचे एस.व्हि.मराठे,प्रकल्प वि.म.वि लातूर पि.बी.सोनवणे,प्रकल्प वि.क्र.अ.लातूर एस.ई.हेलाले, प्रकल्प सहाय्यक उदगीर व्यव्हारे के.जी.प्रकल्प सहाय्यक लातूर एस.एच.खंदाडे, मंडळ कृषी अधिकारी देवनाळे एस.के. शेतीशाळा समन्वय एस.आर.बोराडे,ग्रामसेवक जेठेवार, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाचे एस.बि.राऊत, प्र. ले.स.व्हि.एस.घोडके, एस.पि.कदम, उपसरपंच दिलीप भंडे, पो.पा.सुमनबाई पाटील, समुहसहायक दिपक धनशेट्टे,पि.व्हि.सुरवसे, जाधव किरण आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे डॉ मेघना केळकर म्हणाल्या महिलांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत प्रकल्प तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.तेंव्हा आपल्या गावात शेतीशाळेत आपला सहभाग जास्तीत जास्त वाढला पाहिजे, वैयक्तिक लाभ, सामुहिक लाभ, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून जास्तीत जास्त पोकरा योजनेचा लाभ घ्यावा आसे आवाहन केले.
यावेळी प्रकल्प सहाय्यक श्रीमती पुनम काने यांनी यांनी राज्य प्रकल्पाचे सरपंचास दिले जानारे पत्र वाचवून दाखविले. उपविभागीय कृषी अधिकारी महेश तिर्थकर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी पुढे या व गावाचा विकास करून घेण्याचे आवाहन केले,शेतीशाळा प्रशिक्षक यांनी शेतीशाळेत पक्षी थांबे,फेरोमेन ट्रैप बसवने, पाच टक्के निंबोळी अर्क तयार कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी सुभाष भंडे यांच्या शेतात करून दाखवले व त्याचे महत्त्व समजून सांगितले.या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम क्रषी संजीवनी समितीचे सदस्य, महिला शेतकरी, पुरूष शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी सहाय्यक एच.एस.म्हेत्रे यांनी केले तर माजी सरपंच नामदेव भोसले यांनी आभार मानले.
या महिला शेतीशाळेसाठी कृषीताई वनमाला भंडे, कृषीसखी बायनाबाई साखरे, सि.आर.पि.मंगलबाई साखरे, एम.आय.पि.सि.आर.पि.चित्रकला पाटील,प्रगतशील शेतकरी सुभाष भंडे, धनराज भंडे, विठ्ठल पाटील, रामकिशन साखरे शिवाजी भंडे, शिला भंडे, चतुराबाई मिरकले, संगिता भंडे, शोभा भंडे आदिंनी परिश्रम घेतले. कृषीताई वनमाला भंडे,कृषीसखी बायनाबाई साखरे, सि.आर.पि.मंगलबाई साखरे, एम.आय.पि.सि.आर.पि.चित्रकला पाटील,प्रगतशील शेतकरी सुभाष भंडे, धनराज भंडे,विठ्ठल पाटील, रामकिशन साखरे शिवाजी भंडे,शिला भंडे,चतुराबाई मिरकले, संगिता भंडे, शोभा भंडे आदिंनी परिश्रम घेतले