महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी

रासपचे पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : लिंगायत समाजातील नवउद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी योग्य ती आर्थिक मदत शासनाकडून मिळावी यासाठी समाजातील तरुणांसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी रासपचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लिंगायत समाज हा देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला असून कर्नाटक नंतर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक आहे सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेचे मोर्चे एक लिंगायत कोटी लिंगायत या गर्जनेने आयोजित होत आहेत त्यामुळे समाजाच्या मागण्या व अडचणी आम्ही शासनासमोर आणत आहोत. परंतु केवळ निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणे व नंतर ते आश्वासन पूर्ण न करणे हेच आज पर्यंत घडत आहे. तरी स्वतंत्र धर्म मान्यता व महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी प्रिथ्विरज पाटील यानी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!