खा. ओमराजे निंबाळकर यांनी घेतली खरीप पिक कर्ज वाटप संदर्भात बैठक
तुळजापूर (सागर वीर) : आज शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेची खरीप हंगाम – २०२१ पिक कर्ज संदर्भात बैठक संपन्न झाली. याबैठकीस प्रामुख्याने जिल्हा अग्रणी बँकेचे विजयकर, जिल्हा निबंधक श्री.देशमुख उपस्थित होते. दत्तक बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांनी दर्शनी भागावर गावाची यादी लावण्यात यावी. तालुक्यातील पात्र शेतकरी कर्जपुरवठा पासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, पीक कर्ज संदर्भात लागणारी कागदपत्रे दर्शनी भागावरती लावण्यात यावीत. शेतकरी बांधवांना सन्मापूर्वक वागणूक देण्यात यावी. 31 जुलै पर्यंत जुन्या पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्जीवन करावे. व नविन कर्ज देण्यात यावे. जेणेकरून राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख कर्ज व्याज सवलतीचा लाभ घेता येतो. वेळेत शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही. वन टाईम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांना परत पिक कर्ज पुरवठा करावा. दिलेले टार्गेट वेळेत पुर्ण करावे. अशा बैठकीत सुचना केल्या.
प्रत्येक बँकेस नोडल ऑफिसर नेमण्यात यावा. बँकेतील कमी असलेल्या कर्मचारी संदर्भात पत्रव्यवहार करावा, यासंदर्भात मी हि पाठपुरावा करणार आहे. याबैठकी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ (दाजी) गवळी, शहरप्रमुख सुधिर कदम, अल्प संख्याक जिल्हाध्यक्ष अमीर शेख, उपतालुकप्रमुख सुनिल जाधव, संजय भोसले, रोहित चव्हाण, उप शहरप्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, दिनेश रसाळ, मीडिया प्रमुख चेतन बंडगर, युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे, सिंदफळ विभागप्रमुख बालाजी पांचाळ, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, भिवाजी सावंत, शंकर गव्हाणे तसेच सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवस्थापक, बँक प्रतिनिधी उपस्थित होते.