वलांडी बसस्थानकात वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविले

वलांडी बसस्थानकात वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविले

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वलांडी बसस्थानकावर उदगीरला जाणाऱ्या बसमध्ये चढतांना वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील दिड तोळे सोन्याचे दागिने पळविले. टोळीतील पाच महिला चोरांना वलांडी पोलिसांना काही वेळातच पकडण्यात यश आले. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात पाच चोरटे महिला विरोधात मंगळवार दि.१३ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आशा ग़ुन्हागाराना आळा घालावे आशी जनतेची मागणी होत आहे,
याबाबत देवणी पोलीसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की, लेकीच्या घरी ढवाळ जेवणाचे कार्यक्रम उरकून परत जात असताना वयोवृद्ध महिला दि.१२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वलांडी बसस्थानकावर उदगीरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना तीच्या गळ्यातील दिड तोळा सोन्याचे पान मन्याची चैन जुनी वापरती कि अंदाजे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून लंपास केले. घटनेची माहिती मिळताच वलांडी पोलीस दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे व पोलीस कर्मचारी राजपाल साळुंखे यांनी काही वेळातच वलांडी बसस्थानक परिसरातून टोळीतील पाच चोरटे महिलांच्या मुस्क्या आवळल्या चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिने मिळून आले नाही. या प्रकरणी सुशीलाबाई माधवराव शिराळे वय ८० वर्षे राहणार शेकापूरवाडी ता.उदगीर यांच्या फिर्यादिवरुन देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२१ कलम ३७९, ३४ भादवी प्रमाणे बबिता सुरेश उपाध्याय राहणार उदगीर, मिराबाइ प्रकाश कांबळे राहणार उदगीर, गोदावरी राजु कांबळे राहणार लाळी, छाया राजेश उपाध्ये राहणार लाळी, पुनम युवराज उपाध्ये राहणार उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड हे करीत आहेत.

About The Author