लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ

लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ

पोहरेगाव येथे होणार २२ हजार ५०० वृक्षांची लागवड

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा – जिल्हाधिकारी

रेणापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोहरेगाव येथे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत पोहरेगावात मियावाकी पद्धतीने २२ हजार ५०० झाडांची लागवड केली जाणार आहे. पोहेरेगावचे लोकनियुक्त सरपंच गंगासिंह कदम यांच्या पुढाकारातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. गावालगत असणाऱ्या जमिनीत ही झाडे लावली जाणार आहेत.यासाठी गावालगतची ८० गुंठे जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीत घन वन अर्थात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड होणार आहे. लातूर जिल्हा व रेणापूर तालुक्यात वनक्षेत्राची असणारी तूट भरून काढण्यासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरणार आहे.जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन आपापल्या गावात वृक्ष लागवड करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी याप्रसंगी बोलताना केले.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, उपजिल्हाधिकारी कांबळे, रेणापूरचे तहसीलदार राहुल पाटील, गटविकास अधिकारी अभंगे, पंचायत समितीचे सभापती रमेशराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव चेपट यांच्या हस्तेही यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष शरदराव दरेकर, तालुका कृषी अधिकारी नागरगोजे, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रबशेट्टी, सरपंच महेश खाडप यांच्यासह वृक्षलागवड समितीचे अध्यक्ष रामराव मोरे,सचिव सदानंद शिंदे, उपाध्यक्ष रामराव सरवदे, शरद राठोड,अंकुश शिंदे, हनुमंत केसरे, पांडुरंग सरवदे, उत्तम शिंदे,बाळकृष्ण मोरे, रामदास कदम, संतोष शिंदे, गणपत केसरे, सुभाष वाघ, किशोर राठोड, विशाल मोरे, संतोष गायकवाड,कमलाकर मोरे,पोहरेगावचे उपसरपंच शंकर राठोड,लालासाहेब मोरे, विकास सरवदे, समाधान गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author