श्री संत मोतीराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयात बहि:शाल व्याख्यानाचे आयोजन

0
श्री संत मोतीराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयात बहि:शाल व्याख्यानाचे आयोजन

किनगाव ( गोविंद काळे ) महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आपले ज्ञान व विचार चार भिंती पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी गाव तांडे वाड्या वस्ती वर जाऊन प्रबोधन केले पाहिजे. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे संत साहित्यिक आणि समाजसुधारकांनी आपले जीवन यासाठी खर्ची घातली आहे त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने शाळा, महाविद्यालया बरोबरच वाचनालय, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून बहि:शाल व्याख्यानाचे आयोजन केले जाते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व हिंगणगाव येथील श्री संत अंबाजी महाराज सार्वजनिक वाचनालयच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 05 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता किनगाव येथील श्री संत मोतीराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव घुले राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे याचा लाभ किनगाव व परिसरातील ग्रामस्थ बंधू भगिनींसह विद्यार्थी, विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन श्री संत अंबाजी महाराज सार्वजनिक वाचनालय हिंगणगाव चे सचिव भरत राख, ग्रंथपाल नवनाथ बाबुराव घुले, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक एन.बी. फड, प्राचार्या सागरताई घुले, प्रवेक्षक मुंडे सर, प्राध्यापक भोसले सर, नागनाथ फड इत्यादींनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!