तेलंगे प्रि इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
लातूर (प्रतिनिधी) विद्यार्थी शिक्षक पालक या त्रिसूत्रीतून देशाचा विकास घडू शकतो. विद्यार्थ्याला योग्य वयात योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते असे मत मनपाचे माजी नगरसेवक अनंत गायकवाड यांनी व्यक्त केले
तेलंगे प्रि इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन कोरे गार्डन येथे आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानदेवराव तेलंगे , उद्घाटक म्हणून अनंत गायकवाड माजी नगरसेवक मनपा लातूर तर प्रमुख पाहुणे संतोष केंद्रे सहशिक्षक नूतन विद्यालय लातूर तसेच भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीधर तेलंगे, स्कूलच्या प्राचार्या अश्विनी तेलंगे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रास्ताविक संत गाडगेबाबा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गिरीधर तेलंगे यांनी सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन करण्यात आला. यामध्ये जवळपास 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलाविष्कराने रंगमंचासह उपस्थित बालकांना मंत्रमुक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका पूनम सुरवसे ,सेविका जाधव ताई यांनी प्रयत्न केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खुशी तिवारी तर आभार वैशाली सोमवंशी यांनी मांडले
