तुळजापूर पोलिसांची कामगिरी लई भारी; गांजाची तस्करी करणाऱ्याला केली जेलची वारी

तुळजापूर पोलिसांची कामगिरी लई भारी; गांजाची तस्करी करणाऱ्याला केली जेलची वारी

तुळजापूर (सागर वीर) : गांजाची वाहतूक करणारा छोटा टेम्पो पकडून पोलिसांनी ३४ लाख ३४ हजार २०० रुपयाच्या मुद्देमालासह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.तुळजापूर पोलिसांनी पाठलाग करून येरमाळा हद्दीत गुरूवारी (दि.१५) पहाटे ही कारवाई केली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हैदराबाद येथून आला गांजा
तुळजापूर पोलिसांची कारवाई

हैद्राबाद येथून आणलेला गांजा तुळजापूर येथे वाहनातून उतरविण्यात आला होता. त्यांनतर हा गांजा येथे एका छोट्या टेम्पोत भरून तस्करी सुरू असल्याची माहिती समजली होती. त्यावरून तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.व्ही.काशिद, पोहेकॉ महेश थावरे, विजय राठोड यांनी पाठलाग करुन येरमाळा हद्दीत हा टम्पो पकडला. यावेळी वाहनचालक गोपी लहु कांबळे (रा. मातंगनगर तुळजापूर) व ममता भाऊसाहेब जाधव (रा.जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३ लाख रुपये किंमतीचा छोटा टेम्पो (एमएच २५ – ए जे ३२०१) व ८ पोत्यात भरलेला ३१ लाख ३४ हजार २०० रुपये किंमतीचा गांजा असा एकूण ३४ लाख ३४ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोहेकॉ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लहु कांबळे याच्यासह अन्य आरोपीविरूध्द गुरनं २३९/ २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीत पोलिसांनी अन्य ६ जणांना ताब्यात घेतले आहे. गांजा पांढऱ्या रंगाचा पोत्यात व १० कॅरीबॅगमध्ये ठेवला होता. त्याचे वजन २२ किलो ६ ग्रॅम होते. या कॅरीबॅग उघडल्या असता ओलसर हिरवट रंगाचा पाला व बी स्वरुपात हा गांजा होता. आरोपीत ३ महिला आणि ५ पुरूषांचा समावेश आहे. चालक वगळता अन्य आरोपी जालना येथील रहिवाशी आहेत. तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.व्ही. काशीद, पोहेकॉ विजय राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

About The Author