किशोर तिवारी घेणार १७ जुलैला यवतमाळला विविध विषयांचा आढावा 

यवतमाळ (प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक  शेतकरी मिशनच्या अध्यक्षांना शासनाने दिलेल्या अधिकारात येत्या १७ जुलैला आढावा सभा घेण्यात आहेत. त्यामध्ये खालील विषयावर चर्चा व नियोजन होणार आहे . 

१ – यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१-२२ यासाठी पीककर्ज वाटप ,नव्या व जुन्यापात्र कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नवीन कर्जाचा आढावा ,जिल्ह्यात ४० टक्के व शाखेमध्ये ४०  टक्क्यापेक्षा कमी वाटप केलेल्या सरकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांच्या उपस्थित आढावा व या शाखांवर नोडल अधिकारी तसेच प्रत्येक शनिवारी रविवारी “मागेल त्याला पीककर्ज ” मेळावे आयोजित करण्यासाठी नियोजन 

२ – जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कम्म्युनिटी  वैद्यकीय अधिकारी यांचा कामाचा आढावा व फवारणीमुळे विषबाधा टाळण्यासाठी प्रशिक्षणासाठी नियोजन 

३ – जिल्ह्यात अवैद्यपणे गौण खनिज उत्खलनात संघंटीत गुन्हेगारी तसेच अधिकारी -कर्मचारी यांच्या संगमतामुळे सुरु असलेल्या प्रकार तात्काळ बंद करण्यासाठी व सर्व संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी निणर्य घेण्याबाबत . 

४ – जिल्ह्यात बोगस कामगार सहकारी संस्थांच्या नावांवर राजकीय नेत्यांनी मागील दोन वर्षात केलेल्या शासकीय कंत्राटी कामांचा आढावा व पदाचा गैर वापर केलेल्या प्रकरणाची सी आई डी चौकशी साठी निणर्यासाठी चर्चा . 

५ – खावटी वाटपाचा आढावा व आदिवासी दलित समाजाच्या घरकुल योजनांचा आढावा 

६ – कोरोना महामारी दरम्यान आरोग्य तसेच विविध विभागामार्फत व स्थानीय स्वराज्य संस्था  यांनी महामारीत  केलेल्या प्रत्येक  खरेदीचा व बाह्य ऑडीट  द्वारे त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे  दर व गुणवत्ता याबाबत स्वतंत्र चौकशीबाबत निर्णय

७ – टिप्पेश्वर मधील पांढरकवडा वन विभागात वाघाच्या हल्ल्याबाबत सुरक्षा योजनांचा आढावा तसेच वरपोडावर आदिवासींना झालेल्या मारहाणीची स्वतंत्र चौकशीबाबत बाबत निर्णय 

८ – पोखारा मध्ये झालेल्या कामाचा आढावा  व प्रगतीचा अहवाल 

या आढावा बैठकीला  विनापरवानगीने अनुपस्थित राहणाऱ्या तसेच अपूर्ण व असत्य  माहीती देणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कडक कारवाई करण्यात येईल व जें  अधिकारी माहिती घेऊन  कर्मचारी वा चपराशी पाठविणारं त्यांच्या वरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल स्पष्ट ताकीद यावेळी देण्यात आली आहे. 

About The Author