तब्बल 16 लाखांच्या सोयाबीनची चोरी, औसा पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासांत चोरीचा मुद्देमाल हस्तगत .

0
तब्बल 16 लाखांच्या सोयाबीनची चोरी, औसा पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासांत चोरीचा मुद्देमाल हस्तगत .

लातूर (एल.पी.उगीले) शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास सोयाबीन चोरट्यांनी लंपस केले होते . तब्बल सह लाखाच्या सोयाबीनची चोरी झाल्याने शेतकरी हातबल झाले होते. मात्र असा पोलिसांनी सतर्कपणे 24 तासाच्या आत मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे औसा हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका गोडाऊन मध्ये ठेवलेले शेतकऱ्यांचे तब्बत 100 क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. परंतु औसा पोलीस ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले पूर्ण सोयाबीन अवघ्या 24 तासात परत मिळाले.
लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाणे हद्दीत एमआयडीसी मधील गोडाऊन मधील 4 लाख 39 हजार 200 रुपयांच्या 100 क्विंटल सोयाबीनची चोरी झाली होती. अज्ञात चोरटे 200 कट्टे सोयाबीन दोन वाहना मध्ये टाकून चोरटे पसार झाले होते. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, (औसा)कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सोयाबीन चोरणाऱ्या चोरांबद्दल पोलिसांनी गुप्त माहिती मिळवून 200 कट्टे सोयाबीन आणि एक आयशर टेम्पो व एक बोलेरो जीप जप्त केले.
नमूद चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नामे अभिषेक सुहास यादव, (वय 21, वर्ष राहणार वसवाडी, पाखरसांगवी तालुका जिल्हा लातूर), अभय अवधूत भोळे, (वय 22 वर्ष, राहणार व वसवाडी, पाखरसांगवी तालुका जिल्हा लातूर),मनोज राजू खताळ, (वय 22 वर्ष, राहणार माऊली नगर, पाखरसांगवी तालुका जिल्हा लातूर),हनुमंत भैरवनाथ मुंडे,( वय 39 वर्ष, राहणार टाकळी शिराढोण जिल्हा धाराशिव).यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी चोरी झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात कारवाई करत चोरीला गेलेलं सोयाबीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून चोरी गेलेल्या सोयाबीनची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते परत केले जाणार आहे. सोयाबीनची चोरी करणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकल्या असून 24 तासातच चोरीचा माल हस्तगत करण्यात औसा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे व औसा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहायक फौजदार कांबळे, पोलिस अमलदार गुट्टे, मुबाज सय्यद तुमकुटे,चामे, पाटील, भंडे ,मगर यांनी केली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!