शिवाजी महाविद्यालयात संत सेवालाल जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय सामाजिक धार्मिक सुधारणावादी संत, बंजारा समाजाचे धर्मगुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती शिवाजी महाविद्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते. यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, संत सेवालाल यांनी समाजातील धार्मिक, रुढी, परंपरा नाकारून ते बंजारा समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करुन आपले जीवन जगावे असा संदेश दिला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जयंती समितीचे प्रमुख प्रो.डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
