इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
विद्यार्थी आणि पालकांच्या आग्रहाखातर 11 वी व 12वी च्या क्लासेसचा भव्य शुभारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : मागील 16 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला वाहून घेऊन शेकडो शैक्षणिक विक्रम व निकालाचा नवा इतिहास घडवविलेल्या प्रा.सिद्धेश्वर पटणे सरांच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने विशाल फंक्शन हॉल येथे हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस च्या तज्ञ संचालक आणि मार्गदर्शकाच्या क्षमता विचारात घेऊन विद्येचे माहेरघर असलेल्या उदगीर पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्याकडे सतत मागणी करून आपल्या पाल्यांना अकरावी बारावी साठी इतरत्र जाणे लागू नये असा आग्रह धरल्यामुळे नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या अकरावी व बारावीसाठीच्या नीट, जेईई, सीईटी, बोर्ड इत्यादी नवीन बॅचेस चा शुभारंभही याप्रसंगी करण्यात आला. त्यासोबतच पहिली ते दहावी पर्यंतच्या सीबीएसई क्लासेसचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी चंद्रकांतआण्णा वैजापूरे हे होते, तर उदघाटक म्हणून माजी आ. गोविंदआण्णा केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, चंदरआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, फ़ॉरेस्ट ऑफिसर बालाजी मुदाळे, केमिस्ट्रीचे तज्ञ प्रा.व्यंकट ढोबळे, माजी प्राचार्य चंद्रसेन मोहिते इत्यादी मनावर उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा नेते कुणाल बागबंदे व बापूराव पटणे यांचा सत्कार करण्यात आला, व दिल्ली येथील भारत सरकारचा यंग लीडर अवॉर्ड मिळविल्याबद्दल कु.वैष्णवी श्रीकांत पाटील हिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी केले, त्यांनतर उपस्थित मान्यवरांची यथोचित भाषणे झाली व त्यांनतर दहावी बोर्ड, एनएमएमएस, स्कॉलरशिप, नवोदय अशा विविध परीक्षेत यश मिळविलेल्या 340 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय जामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्लासेसचे सहसंचालक इंजि.परमेश्वर भोकरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी हजरो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
