लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर,प्रमुख अतिथी म्हणून शिवबसअप्पा खराडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवबासअप्पा खराडे यांनी संस्कारक्षम पिढी ही काळाची गरज आहे.आई, वडील आणि गुरुमुळे माणूस घडतो.त्याचा आदर्श निर्माण होतो.वैयक्तीक लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करावाच.देशाला महासत्ता बनवायचे असेल तर नैतिक शिक्षण गरजेचे आहे.जिजाऊ, शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना घडवावे,असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आपली शाळा संस्कार केंद्र आहे.छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून घडले.सर्व शिक्षक बंधू -भगिनींनी आपल्यात अगोदर संस्कार रुजवावा. विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. आपल्या वागणूकीतून,आचरणातून आपले विद्यार्थी घडविण्याचे आवाहन केले.
सुत्रसंचलन सौ.सोनिया देशपांडे यांनी तर,आभार सौ.श्रीदेवी कबाडेबाई यांनी मानले.
