“छावा” चित्रपट टॅक्स फ्री करा – कुणाल बागबंदे
उदगीर (एल. पी. उगीले)
“छावा” हा केवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेला चित्रपट नसून, तो त्यांच्या ज्वलंत इतिहासाची अनुभूती देणारा सिनेमा आहे. अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास नव्याने जिवंत होत असल्याचा भास चित्रपट पाहताना होतो. छत्रपती संभाजी महाराजाचा हिंदी भाषेतील हा पहिलाच सिनेमा आहे. राज्यातील तरुण युवकांना छत्रपती संभाजी महाराजांचे साहस,आदर्श त्याग व धाडसी कारकीर्द पाहता येईल, तसेच नागरिकांना आपल्या कुटुंबिया समवेत सादरीकरण चित्रपट पाहण्यास सोयीचे होईल.या दृष्टीने हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा. अशी मागणी कुणाल बागबंदे यांनी आ.संजय बनसोडे यांच्या मार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री ना.आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
