टाईम्स पब्लिक स्कूलची प्रियंका मुंढे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम.

0
टाईम्स पब्लिक स्कूलची प्रियंका मुंढे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम.

उदगीर (एल.पी.उगीले)
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मानखेड,ता- अहमदपूर च्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावीच्या गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शालेय विद्यार्थ्यासाठीच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत टाईम्स पब्लिक स्कूल उदगीरच्या इयत्ता 7 वी च्या वर्गात शिकणारी प्रियंका ज्ञानोबा मुंढे हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. गतवर्षीही या स्पर्धेत प्रियंकाने पहिलाच क्रमांक मिळवला होता. यावर्षीच्या स्पर्धेत इयत्ता आठवी नववी दहावीच्या वर्गात शिकणारे सातारा, परभणी, बीड, नांदेड, धाराशिव व लातूर या जिल्ह्यातील अनेक स्पर्धक विद्यार्थी असतानाही इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारी प्रियंका 61 विद्यार्थ्यांमधून अव्वल ठरली. प्रियंकाच्या या यशाबद्दल आयोजित बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन प्रियंका मुंढेचा सत्कार करण्यात आला.प्रियंका ही गट साधन केंद्र उदगीर येथील विषय साधनव्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे यांची मुलगी आहे. प्रियंकाच्या या यशाबद्दल टाईम्स पब्लिक स्कूल उदगीरचे अध्यक्ष ईश्वरप्रसाद बाहेती,सेक्रेटरी विजयकुमार कप्पीकेरे,कोषाध्यक्ष मंगला कप्पीकेरे,प्राचार्य अभिजित नळगीरकर,उपप्राचार्य शिवकांता शेटकार, पर्यवेक्षक प्रतिभा शेरीकर, मार्गदर्शक शिक्षक मधुमती किणीकर, बबिता मसगले,उषा शिंदे,शिवनंदा धानुरे,काव्या सोंत,मनिषा सावंत , संदेश शिरसाठ, पांडुरंग काजबा, संगम कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. या अगोदरही प्रियंकाने अनेक राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत. प्रियंकाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!