नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न

0
नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भोई गल्ली उदगीर येथील नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात बालवाडी, पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी भाषण व लेझिम स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सौ.मंजुषा कुलकर्णी ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा धोंड व प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये भाषण स्पर्धेत बालवाडी गटातून .विरा जामकर, क्रिशा वाले, मानशी गडपे, आर्वी मनुकर या विद्यार्थ्यांनी व पहिली ते तिसरी पर्यंतच्या प्रतिज्ञा बेळकिरे, नंदिनी उकंडे, मणियार फय्याज, मोनिका शिंदे यांनी सहभाग नोंदवला. तर सातवीच्या अनेक विद्यार्थ्यानी लेझिम, काठी प्रात्यक्षिके व नृत्य या स्पर्धेत सहभाग नोंदवला .या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सानवी दमकोंडवार ही विद्यार्थीनी छ.शिवरायाच्या वेशभूषेत आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोनाली म्हेत्रे हिने केले तर प्रणिता राठोड हिने उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा मीरा अनंतवाळ, सचिव सौ.सुनीताअनंतवाळ,रंजना हिवरे, राधाबाई हिवरे, अरुणाबाई हिवरे, संगीता अनंतवाळ, वर्षा रंगवाळ, सपना उकंडे, चंचला रंगवाळ, निर्मला हिवरे, शकुंतला उकंडे, शिला रंगवाळ यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!