छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात संत रविदास महाराज जयंती साजरी

0
छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात संत रविदास महाराज जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व जयंती समितीच्या वतीने संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यावेळी प्राचार्य मांजरे यांनी संत रविदास सोळाव्या शतकातील भक्ती चळवळीचे गूढ कवी, उत्तर भारतामध्ये त्यांनी आध्यात्मिक शिक्षक म्हणून कार्य केले. ते एक समाजसुधारक व परिवर्तनशील लेखक होते. भारतभर फिरून त्यांनी महान समाजकार्य केले.त्यांनी आपल्या काळात समाजातील रूढी, परंपरा यावर भाष्य करुन परिवर्तनाचा विचार लोकांपर्यंत पोहचविले असे मत प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख प्रो. डॉ. सुरेश शिंदे यांनी केले.यावेळी कार्यक्रमास प्रबंधक बी. के. पाटील, अधीक्षक व्ही.डी. गुरनाळे, मुख्य लिपिक आर.एम. लाडके, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!