जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

0
जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले)
जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा तीन वयोगटांमध्ये घेण्यात आल्या,वयोगट 10 -13 व 15 वर्षाखालील खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश होता.
ही स्पर्धा गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी उदगीर येथे पार पडली.
या स्पर्धेसाठी उद्घाटक डॉ. मोहन वाघमारे, उमाकांत भेदे, खलीलखान पठाण हे मान्यवर होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात झाली .
या स्पर्धेमध्ये गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत असे यश प्राप्त केले .
10वर्षा खालील वयोगटांमध्ये अर्णव मोहन वाघमारे – प्रथम,
मुली मध्ये माही संदीप धुतमल -प्रथम, अनन्या हरिदेव पवार -द्वितीय,कल्याणी हरिदेव पवार -प्रथम (कंपाउंड राउंड प्रकारामध्ये प्रथम ),13 वर्षाखालील वयोगटां मध्ये इंडियन राउंड प्रकारामध्ये समर्थ उमाकांत भेदे – प्रथम, विनीत यमनायमुनाजी भुजबळे – द्वितीय, शरण संदीप देशमुख -तृतीय ,
पवन सतीश मुरकुटे -चतुर्थ,कृष्णा बालाजी केंद्रे – पाचवा, तसेच मुली मध्ये मारियानाज खलीलखान पठाण – प्रथम, भारती बाबाराव पवार – प्रथम (रिकर्व राऊंड मध्ये ),वयोगट 15 वर्षाखालील इंडियन,रिकर्व आणि कंपाऊंड राऊंड मध्ये समर्थ उमाकांत भेदे – प्रथम, नैतिक महिंद्र बिरादार -द्वितीय, शरण संदीप देशमुख – तृतीय, हर्षवर्धन अभिजीत पवार – चतुर्थ, मुलीमध्ये जानवी बाबाराव पवार -प्रथम, भारती बाबाराव पवार -प्रथम, या सर्व विजयी खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुलांचा सत्कार करण्यासाठी डॉ ज्योत्सना वाघमारे ,उदगीर रेल्वे स्टेशनचे स्टेशन कंट्रोलर संदीप धुतमल ,खलीखान पठाण ,गणेश मुंडे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या सर्व खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे .राज्यस्तरीय स्पर्धा 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत रत्नागिरी डेरवण या ठिकाणी होणार आहेत.
हे सर्व खेळाडू गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये शिकत असून
त्यांना मुख्य प्रशिक्षक सुधीर पाटील ,सुषमा पवार आणि मारोती बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले आहे .
या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे ,सचिव आशोक जंगमे ,सहसचिव राजेश देवकर,नवनाथ गरगटे ,हनुमंत देवकर ,क्रीडा प्रेमी भास्कर पाटील ,महेंद्र बिरादार ,संदीप देशमुख ,यमुनाजी भुजबळे,जिलानी शेख यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!