दररोज ताक पिण्याची चळवळ लोकचळवळ व्हावी – बसवराज पाटील नागराळकर

0
दररोज ताक पिण्याची चळवळ लोकचळवळ व्हावी – बसवराज पाटील नागराळकर

उदयगिरी महाविद्यालयात सामूहिक ताक पिण्याचा उपक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सामूहिक ताक पिण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी बसवराज पाटील नागराळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. बी. अलापुरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना बसवराज पाटील नागराळकर यांनी ताक पिण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “ताक पिल्याने शरीरातील चांगल्या सूक्ष्मजीव जंतूंची वाढ होते आणि शरीर निरोगी राहते. त्यामुळे दररोज ताक पिण्याची चळवळ लोकचळवळ म्हणून पुढे यायला हवी.” प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी विद्यार्थ्यांना ताक प्राशन करण्याचा सल्ला दिला आणि निरोगी जीवनासाठी नियमित ताक पिण्याची सवय लावण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक ताक प्राशनन करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभाग आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रा.भाताडे, प्रा. लांडगे यांनी विशेष मेहनत घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!