नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझायन, ची पांढरे चंचल प्रताप, प्रथम
उदगीर (एल.पी.उगीले) श्री गुरुगोविंद सिंग जी कॉलेज नांदेड येथे आयोजित PRAGYAA 2025 निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात स्टाईल युवर पार्टनर या नॅशनल लेव्हल स्पर्धेमध्ये नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असता, त्यात महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी पांढरे चंचल प्रताप प्रथम पारितोषक पटकावले आहे.
मागच्या वर्षाच्या स्पर्धेतही नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील विद्यार्थिनी कोमल वाघमारे ,प्रेरणा मुंगे, साक्षी कांबळे,पिंकी कसबे, रूपाली चव्हाण, अंबिका बळकुंदे, या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर यश संपादन करून महाविद्यालयाच्या यशात भर घातली होती. यावर्षी स्पर्धेमध्ये पांढरे चंचल प्रताप या विद्यार्थिनीने पुन्हा एकदा यश खेचून आणले आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.राम गायकवाड ,प्राचार्य रूपाली साबळे, प्रा गौरव बच्चेवार, प्रा.पूजा कच्छवे ,प्रा. सुमेधा साळवे, प्रा.गायत्री नंदगावे, प्रा.प्रतीक्षा माने ,सुधीर शिंदे शिवलिंग बोधले, बाबासाहेब गायकवाड, आदींनी अभिनंदन केले आहे.
