सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन

0
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन

अहमदपूर( गोविंद काळे ) महायुतीतील घटक पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन उद्या दि २७फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार असल्याची माहिती सत्कार समारंभ समितीच्या वतीने देण्यात आली.

येथील महात्मा गांधी कॉलेजच्या मैदानावर सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा दव्यिभव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले हे राहणार असून या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, शेजारील गंगाखेड-पालम विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, मराठवाडा पदवीधारक मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, गोपाळराव माने, डॉ. अफसर शेख, बाबासाहेब कांबळे हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सत्कार संयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आली
सत्कार समारंभापूर्वी सकाळी – विविध विकासकामाचे भूमिपूजन मान्यवरांकडून होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अहमदपूर मतदारसंघावर फार उपकार असून नामदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी केवळ मंत्रीपदाची मागणी केली होती पण त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच तालुक्याला कॅबिनेट व तेही महत्त्वाचे सहकार खाते दिले आहे. त्यामुळे हा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे. हा सत्कार सोहळा महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सरचिटणीस शिवानंद हेंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शहर अध्यक्ष अझहर बागवान, आशिष तोगरे, चंद्रशेखर भालेराव आदींची उपस्थिती होती

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!