शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

0
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना गैरकायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली असुन सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे दि २० फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे पथक उभे होते. या पथकात तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, मंडळ अधिकारी कैचे, तलाठी संतोष खोमणे, तलाठी महेश गुपिले यांचा समावेश होता. यावेळी नांदेडकडून अहमदपूर कडे वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पथकाने कारवाई केली.

तहसील कार्यालयातील कर्मचारी शासकीय कर्तव्य पार पाडत असताना मंडळ अधिकारी कैचे यांनी एक हायवा अडविला होता. यावेळी सहा ते सात जणांनी एकत्र येऊन त्यास विरोध करीत शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत विशाल कैचे यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण वानखेडे व अन्य पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस हवालदार आरदवाड हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!