ढोरसांगवी शाळेत स्वयंशासन दिन संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले) :- जळकोट तालुक्यातील वांजरवाडा केंद्रातील ढोरसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन घेण्यात आला. यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यानी एक दिवस स्वत्तः शाळा चालवून त्यांच्यात लोकशाहीची पाळेमुळे किती घट्ट रुजली आहेत, हे सिद्ध करून दाखवले.अतिशय नियोजन बध्द व शिस्तबध्द पध्दतीने कुणाचे कसले ही मार्गदर्शन न घेता दररोज चालत असलेल्या शाळेचे निरीक्षण करून कोणते गुरुजी कसे वागतात ,कसे शिकवतात ,कोणाची जबाबदारी काय आहे? याचे अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करून उत्तम प्रशासन चालविले,यावेळी मुख्याध्यापक म्हणून कु.देऊ ज्ञानोबा पोतने हिने जबाबदारी सांभाळली, तर उपमुख्याध्यपक म्हणून कु.रुपाली दत्ता पोतने हिने काम पाहिले. चेतन वाघमारे,माणिक ढगे, संगमेश्वर वाघमारे, अवदुत पंडित ढगे, महेश वाघमारे, रितिका वाघमारे, दिक्षा ढगे, साधना सोनकांबळे, अदिति पाटील,सोनी ढगे,महेश वाघमारे, दयानंद वाघमारे, संध्यारानी डावळे, सरस्वती कदम, आदींनी सहशिक्षक म्हणून सुंदर भूमिका वठवली,तर सेवक म्हणून अवदूत गोपाळ ढगे यांनी खूप छान भूमिका वठवली.यावेळी प्रथमिक पदवीधर जी.टी.मुंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना हक्क व कर्तव्य याची जाणीव करून दिली , हे सांगताना ते म्हणाले की, दुरून डोंगर साजरे दिसतात, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा ,जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे,असे उदाहरणे देऊन पटवून दिले,तसेच विद्यार्थी, शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश गुरमे, जी.टी.मुंडे ,ज्ञानोबा टेकले, नलाबले युवा प्रशिक्षणार्थी वर्षा बामणे आदी उपस्थित होते.
