शास्त्री प्राथमिक शाळेत गोळवलकर गुरुजी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

0
शास्त्री प्राथमिक शाळेत गोळवलकर गुरुजी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्कार केंद्रप्रमुख अंकुश मिरगुडे, प्रमुख पाहुणे म्हणून माधव केंद्रे उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माधव केंद्रे यांनी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक होते.त्यांच्या अंगी आत्मविश्वास व एकाग्रता हा महत्त्वाचा गुण होता.श्रीगुरुजींनी केलेल्या महान सेवा कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी गोळवळकर गुरुजी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही देश सेवेसाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले.
सूत्रसंचालन आगलावे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!