तादलापुरात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन,वाड्यात भरणार साहित्यिकांचा मेळा
उदगीर (एल.पी.उगीले)
मागच्या काही दशकांपासून कथा, कादंबऱ्या चित्रपटांद्वारे वाड्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पहिले राज्यस्तरीय ‘गावगाडा’ साहित्य संमेलन तालुक्यातील तादलापूर येथील पाटलांच्या वाड्यात भरविण्यात येणार आहे. माय मराठी, अरुणा प्रकाशन आणि निसर्ग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध
गांधीवादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक तथा वक्ते प्रा. मॅक्सवेल लोपीस राहणार असून संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अमूर्त संस्कृती संचिताचे संशोधक डॉ. साहेब खंदारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जि. प. चे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल कांबळे, मसापचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सोळाव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. अंजुम कादरी, प्राचार्य बी.टी.लहाणे आणि देवनागरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामाप्रसाद धनूरे हे उपस्थित राहणार आहेत. रविवारी दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ‘का अशी झालीत गावे?’ या विषयावर पहिला परिसंवाद होणार सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या परिसंवादात प्रा. डॉ.नारायण कांबळे,प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर,प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार आणि तानाजी घोलप हे आपले विचार मांडणार आहेत.
दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत ‘शेती मातीच करणार काय?” हा दुसरा परिसंवाद होणार असून जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या परिसंवादात प्रा. डॉ.जयद्रथ जाधव, प्रा. डॉ.ज्ञानदेव राऊत आणि माधव मल्लेशे हे आपापल्या भूमिका मांडणार आहेत. दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत सुप्रसिद्ध कवी तथा वक्ते प्रभाकर साळेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून मान्यवर कवींच्या सहभागाने नटलेल्या या संमेलनाचे सूत्रसंचालन राजेसाहेब कदम हे करणार आहेत. सायंकाळी
५.३० ते ६.३० या वेळेत संमेलनाचा समारोप होणार असून प्रसिद्ध उद्योजक सागर सुरेश महाजन उदगीर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोपासस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव पृथ्वीराज पाटील एकंबेकर, रसिका शैक्षणिक संकुलाचे सचिव गजानन भोपणीकर, उद्योजक उदय मुंडकर आणि डॉ. धनाजी कुमठेकर हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष प्रा. मॅक्सवेल लोपीस यांच्या समारोपाच्या भाषणानंतर हे संमेलन पूर्णत्वाला जाणार आहे.
या आगळ्यावेगळ्या संमेलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक राजेसाहेब कदम,प्रा.शिवशंकर पाटील,प्रा.अनिल चवळे ,प्रा. डॉ.कांत जाधव,प्रा. राजकुमार बिराजदार, डॉ.दीपक चिद्दरवार, डॉ.सुरेश शिंदे , डॉ.गोरोबा रोडगे, प्रा.राजकुमार मोरे, कालिदास सोमवंशी आदिंनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
