अध्यक्षपदी रत्नदीप सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी पृथ्वीराज पवार यांची निवड.
उदगीर (एल.पी.उगीले) येथील बहुजन विकास अभियानाच्या तालुका युवा आघाडीचे अध्यक्षपदी रत्नदीप सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी पृथ्वीराज पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. बहुजन विकास अभियानाच्या वतीने अभियान प्रमुख संजयकुमार यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भोसले, संघटक मानसिंग पवार यांच्या वतीने रत्नदीप सूर्यवंशी व पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार करून, त्यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे गोरख वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण, राजेश्वर भाटे, भीमराव आळसपुरे, अंबादास पाटील, शेख सय्यद, अमोल सूर्यवंशी, रामभाऊ माने आदी उपस्थित होते.
