सीमा भागात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले) सीमाभागातील औराद तालुक्यात औराद या ठिकाणी संभाजी ब्रिगेड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद कप्पिकेरे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार सहित अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वागत भाषण गोविंद पाटील संभाजी ब्रिगेड औराद तालुका अध्यक्ष यांनी केले. तर प्रस्ताविक भाषण सतिष दादा वासरे संभाजी ब्रिगेड बिदर जिल्हा अध्यक्ष यांनी केले.
लोकमुद्रा ग्रुपचे संचालक सुभाष दादा शेडोळे यांनी ह्या संघटनेमधून मी बँकिंग व कृषीकेंद् ४० शाखा स्थापन केलो. ३०० लोकांच्या हाताला कामे दिले. मी संभाजी ब्रिगेडला केव्हाही विसरत नाही.संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी आपल्या मनोगतातुन सर्वांना संबोधित केले की, सीमा भागातील मावळ्यांनी मला हाक द्या, तुमच्या अडचणी आम्ही एक तासात पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी सप्तखंजीर वादक रामपाल महाराज धारकर यांचा समाज प्रबोधनावर सप्तखंजिर कीर्तन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
शिवजयंती निमित्त एकंबा येथे कमालनगर, औराद तालुक्यातील विध्यार्थ्यांचे भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले होते. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात बक्षीस वितरण करून, त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांची,लहान,थोर, विद्यार्थी, यांच्यासह कमालनगर,औराद, उदगीर, गावखेड्यातील, जनतेची व कर्नाटक च्या बाहेरून आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती.
जास्तीत जास्त कष्ट घेऊन, हा देखणा सोहळा येशस्वी पणे पार पाडण्याऱ्या आयोजक, नियोजक,सहकारी, तालुक्यातील संभाजी ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते सर्वांचेच आभारी संयोजकाच्या वतीने व्यक्त करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजीव पाटील,दत्ता डावरगावे यांनी केले आहे.कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला.
