श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.
उदगीर (एल.पी.उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष नादरगे एस.व्ही. यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. कुसुमाग्रज यांच्या साहित्य जीवनाची ओळख प्रमुख पाहुणे देवकते पी.बी. यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कासले जी. एच. यांनी केले. आभार भोळे आर.आर यांनी मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
