सैनिकी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

0
सैनिकी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिका अश्विनी निवर्गी, प्रा. सीमा मेहत्रे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख विलास शिंदे, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, प्रल्हाद येवरीकर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी, नाटककार, समीक्षक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अश्विनी निवर्गी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. अमृतापेक्षाही जास्त गोडवा व माधुर्य मराठी भाषेत आहे. मराठी भाषेतील अक्षरांमध्ये असा गोडवा असेल की जे अमृतालाही आपल्या कमीपणाची जाणीव करून देईल. संतांनी मराठी भाषेला समृद्धी प्राप्त करुन दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा अल्प परिचय एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी करुन दिला.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी कथा, कविता, कादंबरी याचे वाचन करावे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड, उज्वला वडले, शिवकुमार कोळ्ळे, सुनील महिंद्रकर, विनायक करेवाड, उमाकांत नादरगे, सतीश जगताप, मारोती मारकवाड यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!