लाल बहादूर शास्त्री विद्यालयात ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) लालबहादूर शास्त्री विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक कृष्णा मारावार, पर्यवेक्षक किरण नेमट व प्रमुख मार्गदर्शक विद्यार्थीनी श्रुती माचपल्ले यांची उपस्थिती होती.
मराठी विभाग प्रमुख अंबिका पारसेवार यांनी विद्यार्थ्यांना कवी कुसुमाग्रज यांचा परिचय व मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास सांगितला.
प्रमुख मार्गदर्शक श्रुती माचपल्ले हिने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, याविषयीचे निकष सांगितले.
या प्रसंगी सुप्रिया बुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी साहित्यातील विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. अभंग वीरेन पांचाळ, मराठी गौरव गीत भाग्यश्री ,राजनंदिनी ,सुमती या विद्यार्थिनींनी सादर केले. मराठी भाषेचा पोवाडा कविताने सादर केला. वासुदेव गीत अनुष्का या विद्यार्थिनींनी सादर केले.
अध्यक्षीय समारोपात कृष्णा मारावार यांनी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा गौतम यांनी तर आभार आशा कल्पे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
