विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले)
किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर मुख्याध्यापक अध्यक्ष राम ढगे, पर्यवेक्षक राजेंद्र कुमार व लाकडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हणमंते, डि.के जाधव, श्रीमती बिरादार यांची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कुसुमाग्रज यांच्या साहित्य जीवनाची ओळख प्रमुख पाहुणे मराठीचे शिक्षक एस.एस घटकार यांनी आपल्या मनोगतातून करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ जमील अत्तार यांनी केले. आभार अविनाश पोशेट्टी यांनी मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
