जय हिंद पब्लिक स्कूल ची मान्यता रद्द करा, बहुजन विकास अभियानाची मागणी

0
जय हिंद पब्लिक स्कूल ची मान्यता रद्द करा, बहुजन विकास अभियानाची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : आदिवासी मुलीचे अत्याचार प्रकरणात शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यावर खटले दाखल करून, शासन झाले पाहिजे. हा प्रकार गेल्या 2024 पासून चालू आहे. एकाच वर्षांमध्ये दोन आदिवासी मुलीचा मृत्यू या पब्लिक स्कूलमध्ये झाला आहे. आता तर 56 वर्षाच्या देशमुख शिक्षकाने आपल्या शिक्षक पेशाला काळीमा फासून सोळा वर्षाच्या नाबालिक आदिवासी जमातीच्या विद्यार्थिनीवर विनयभंग सारखा अत्याचार केला आहे. म्हणून या शाळेची मान्यता त्वरित रद्द झाली पाहिजे, यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बहुजन विकास अभियानाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात महिला, पुरुष यांनी घोषणाबाजी करून, आदिवासी हे एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. हे दाखवण्यासाठी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमला. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार, महिला आघाडी प्रमुख ज्योती एकुरकेकर, मानसिंग पवार, संजय उजेडकर, अमोल सूर्यवंशी, गोरख वाघमारे, भीमराव आळसपुरे, अंबादास पाटील, आनंद पाटील, गंगाधर शेवाळे, पप्पू शेवाळे, कृष्णा गाडेकर, शिवाजीराव पाटील, शंकरराव शेरे, सरुबाई सूर्यवंशी, चंद्रकला वाघमारे, हबीब पठाण, शिवाजी पाटील, रवी डोंगरे आदीसह असंख्य महिला, पुरुष उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!